गोव्याच्या स्टेट गॅलरी मधील एम.एफ.हुसैन यांच्या पेंटींगला विरोध

August 11, 2009 1:42 PM0 commentsViews: 5

11 ऑगस्टगोव्याच्या स्टेट गॅलरी एम.एफ हुसैन यांचं पेंटींग काढण्याची मागणी एका हिंदू संघटनेने केली आहे.हिंदू जनजागृती समितिच्या कार्यकर्त्यांनी देशाच्या इतर कट्टर हिंदू संघटनांच्या वतिने एम.एफ हुसैन यांच्या कामाचा निषेध करत त्यांचं हे पेंटींग काढण्याची मागणी केली आहे.'व्हाईट बुल' या नावाचं हे पेंटींग कोणत्याच धर्माला आक्षेपार्य नसले तरी हा निषेध एम.एफ.हुसैन यांच्या विरोधात करण्यात आला आहे. हिंदू जनजागृती समितिचे समन्वयक जयेश थाली यांनी महाराष्ट्र सरकारला दिलेल्या विनंतीपत्रामध्ये म्हटलं आहे की एम.एफ.हुसैन यांनी काढलेल्या हिंदू देवी देवता आणि भारत मातेचे नग्न आणि अश्लील चित्रांनी करोडो हिंदू भक्त आणि भारतीयांची भावना दुखावल्या आहेत.नॅशनल ऑनर ऍक्ट अंतर्गत एम.एफ. हुसैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं .

close