शतकातील सर्वात मोठा दुष्काळ – प्रणब मुखर्जी

August 11, 2009 1:45 PM0 commentsViews: 2

11 ऑगस्ट यंदा देशात शतकातला सर्वत मोठा दुष्काळ पडला असल्याच केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं. देशात 161 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, ही परीस्थिती हाताळण्यासाठी सरकार तयार असल्याचही त्यांनी सांगितलं आहे. दुष्काळामुळे 2009-10 या आर्थिक वर्षात देशाचं राष्ट्रीय उत्पनाचा दर 6 टक्के राहील असा अंदाज आहे. असं असलं तरी देशाला मिळणारं थेट महसूली उत्पन्न 3.7 लाख कोटी रूपयांच्या आसपास राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लांबलेल्या मान्सूनबाबत पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देखील मंगळवारी कृषी मूूल्य आयोगाचे महेंद्रा देव यांच्याशी या विषयावर चर्चा केली. आणि याबाबत त्वरीत उपाय योजण्याच्या सूचनाही केल्या. मनमोहन सिंग यांनी 13व्या वित्त आयोगाचे चेअरमन विजय केळकर आणि नियोजन आयोगाचे सेक्रेटरी सूधा पिल्लई यांची भेट घेऊन देशातील उपाय योजनांची माहीती घेतली. याआधी पंतप्रधानांनी साठेबाजांवर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

close