पीडीपीच्या आमदाराने हवेत गोळीबार करून साजरा केला विजयोत्सव

December 26, 2014 3:02 PM0 commentsViews:

26 डिसेंबर :  विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या पीडीपीच्या आमदाराने एके- 47 रायफल मधून हवेत गोळीबार करत आनंदोत्सव साजरा केला. सोनावारमधून त्यांनी माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुलाचा पराभवल केल्याच्या आनंदात गोळीबार केला.

सोनावार मतदारसंघामधून ‘पीडीपी’चे उमेदवार मोहम्मद अश्रफ मीर हे विजयी झाले आहेत. त्यांनी माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा जवळपास 4000 मतांनी पराभव केला आहे. त्याचं आनंदात विजयी मिरवणूकीदरम्यान मीर यांनी एके- 47मधून हवेत गोळीबार केला.

दरम्यान, मीर यांच्या हातात असलेली रायफल त्यांची आहे की त्यांच्या सुरक्षा रक्षकाची हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close