मुंबईतील शाळा-कॉलेजेस् सात दिवस बंद

August 12, 2009 8:14 AM0 commentsViews: 8

12 ऑगस्ट मुंबईतील शाळा, कॉलेजेस आणि कोचिंग क्लासेस सात दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मल्टिप्लेक्स आणि थिएटर्स तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. पुणे, ठाणे आणि नवी मुंबई पाठोपाठ मुंबईतही H1N1 चा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. मुंबईतील शाळा कॉलेजेस 19 ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकाने संबधितांना दिले आहेत. बुधवारीच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना प्रतिकात्मक दहीहंडी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या नंतर ठाण्यातील संघर्ष मंडळानेही दहीहांडी उत्स्‌व साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे.

close