राज ठाकरे यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जाहिर

August 12, 2009 8:27 AM0 commentsViews:

12 ऑगस्टश्रीरामपूर कोर्टाने राज ठाकरे यांना अजामीनपात्र अटक वॉरंट बजावला आहे. राज ठाकरेंना अटक केल्याचा निषेध करण्यासाठी 22 ऑक्टोबर 2008 ला मनसे कार्यकर्त्यांनी शहरात निदर्शनं केली होती. त्यावेळी एसटी बसेसची जाळपोळ, नासधूस करण्यात आली होती. तसंच श्रीरामपूर बंद करण्यात आलं होतं. याबद्दल 9 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी एकूण 7 गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये राज ठाकरेंना आरोपी करण्यात आलं आहे. पोलिसांनी त्यावेळी राज ठाकरेंना फरार घोषित केलं होतं. राज ठाकरेंना अजून अटक का केली नाही, याचे उत्तर कोर्टाने विचारलं आहे.

close