आयपीएलचा तीसरा सीझन मार्च 2010 मध्ये

August 12, 2009 8:46 AM0 commentsViews: 3

12 ऑगस्टमुंबईत मंगळवारी तब्बल चार महिन्यांनंतर आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंन्सिलची मीटिंग झाली.या मिटींगमध्ये आयपीएलच्या तिस•या सीझनचा कार्यक्रम नक्की करण्यात आला.आयपीएलचा तिसरा सीझन मार्च 2010 मध्ये होणार आहे.पहिली मॅच 12 मार्चला हैदराबादमध्ये रंगणार आहे.या स्पर्धेत एकुण 60 मॅच रंगणार आहेत.विशेष म्हणजे यंदा तिस•या क्रमांकासाठीही लढत होणार आहे.याशिवाय नागपूर, विशाखापट्टणम, अहमदाबाद आणि धरमशाला या नव्या चार ठिकांणांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. 15 डिसेंबर 2009 ते 5 जानेवारी 2010 या कालावधीत खेळाडूंची देवाण-घेवाण करता येणार आहे. आयसीएलला सोडचिठ्‌ठी दिलेल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी देण्याचा निर्णय मात्र येत्या दोन दिवसात घेतला जाणार आहे. या बैठकीत चॅम्पियन्स लीगवरही चर्चा झाली.चॅम्पियन्स लीगही यावर्षी ऑक्टोबर महिन्यात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 12 टीम्स सहभागी होणार असून स्पर्धेची पहिली मॅच ही 8 ऑक्टोबरला बंगलोरमध्ये होणार आहे.

close