भिवंडीत लाकडाच्या गोदामाला भीषण आग; 8 जणांचा मृत्यू

December 27, 2014 11:23 AM0 commentsViews:

27 डिसेंबर  : भिवंडी शहरात आज (शनिवारी) पहाटे एका लाकडाच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत आठ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.

भिवंडी शहराजवळलच्या माणकोली गावातल्या मढवी कंपाऊंडमध्ये असलेल्या, लाकडाच्या गोदामाला पहाटे 3च्या सुमारास आग लागली. अग्निशामन दलाने ही आग आटोक्यात आणली असली तरी, यामध्ये दुकानात झोपलेल्या अकरा कामगारांपैकी आठ जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर, तिघेजण गंभीर जखमी आहेत. त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आगीचे नेमके कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नसून आगीमध्ये गोदाम जळून खाक झाले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close