H1N1मुळे राज्यात 11 तर देशात 15 मृत्यूमुखी

August 12, 2009 8:44 AM0 commentsViews: 2

12 ऑगस्टH1N1मुळे राज्यात मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या वाढत आहे. या आजाराने आतापर्यंत राज्यातील विविध शहरात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिकमध्ये एकाचा, तर पुण्यात आणखी तिघांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात बुधवारी पहाटे रुपेश गांगुर्डे या डॉक्टरांचा नाशिकच्या जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाला आहे. तर पुण्यात 35 वर्षांच्या संजय मिस्त्री यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना 9 ऑगस्टला ससूनमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून ते व्हेंटिलेटरवर होते. तर 29 वर्षाच्या श्रावणी देशपांडे या तरुणीचाही मृत्यू झाला आहे. तिच्यावर 10 तारखेपासून ससूनमध्ये उपचार सुरु होते. पुण्यात आतापर्यंत 8 रुग्ण दगावले आहेत. तर देशभरात या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 15 झाली आहे.

close