सुरेश प्रभुंच्या हस्ते मोबाईल तिकिट अॅप्लिकेशनचा शुभारंभ

December 27, 2014 8:13 PM0 commentsViews:

Ticket app

27 डिसेंबर  : मुंबईतील लोकल ट्रेन प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लोकलच्या तिकीटांसाठी तासनतास रांगेत वाया जाणारा वेळ आता वाचणार आहे. तुमच्या मोबईलवरुन तुम्ही आता लोकलचं तिकीट बुक करू शकता. त्यासाठी रेल्वेने ‘आर वॉलेट अॅप्लिकेशन’ तयार केलं आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज (शनिवारी) या तिकिट प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुंबईचे पालकमंत्री आणि शिवसेना आमदार सुभाष देसाईदेखील उपस्थित होते.

तुम्ही हे अॅप तुमच्या मोबाईलच्या ‘प्ले स्टोअर’वरुन डाऊनलोड करू शकता. अॅप डाऊनलोड केल्यानंतर, तुमचा मोबाईलनंबर आयआरसीटीसीकडे नोंदवावा लागेल. त्यानंतर ज्या मार्गावर प्रवास करायचा आहे, त्या मार्गाचं तिकीट निवडून, नेट बँकिंगद्वारे तिकीटाची रक्कम भरावी लागेल. नेट बँकींगद्वारे तिकीटाचे पैसे भरल्यानंतर रेल्वेकडून एक मॅसेज येईल. या मॅसेजवरून तिकीट बुक केल्यावर स्टेशनवरच्या ATVM मशिनवर जाऊन मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर तिकीटची प्रिंट आऊट मिळेलं.

या सेवेमुळं लोकलचं तिकीट काढण्यासाठी रांगा कमी व्हाव्यात म्हणून रेल्वे प्रयत्न करतंय, ही आनंदाची आणि स्वागताची गोष्ट असली, तरी त्यात अनेक त्रुटी असल्याचं लक्षात आलं आहे.

1. रेल्वेचं ऍप तुमच्या बँकेच्या ऑनलाईन अकाउंटसोबत जोडता येत नाही. तुम्हाला तुमच्या ऍपमध्ये पैसे भरण्यासाठी सुरुवातीला तिकीट खिडकीतच जावं लागणार
2. सध्या सुरुवातीचं स्टेशन हे दादरच आहे. त्याशिवाय कोणत्याही स्टेशनपासून सुरू होणारं तिकीट काढणं सध्या शक्य नाही
3. सध्या या ऍपवरून मासिक पास काढणे शक्य नाही
4. मोबाईलवर ई-तिकीट दाखवून चालणार नाही. तुमच्या ई-तिकिटाची प्रिंटआउट स्टेशनवरच्या ATVM मशीनवर जाऊन काढावी लागेल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close