फ्लॅश बॅक 2014 : ऑटो मार्केटची सफर…

December 27, 2014 6:25 PM0 commentsViews:

अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच मोबाईल आणि टू व्हिलर तर मस्टच… 2014 मध्ये दमदार बाईक आणि शानदार गाड्यांची धूम होती…एक से एक अशा कार आणि बाईक ग्राहकांच्या सेवेत दाखल झाल्यात… सरत्या वर्षातील या ऑटो मार्केटची ही सफर…

सुरुवातीला पाहूयात भारतीय बाजारपेठेत नव्याने आलेल्या हॅचबॅक गाड्या म्हणजेच ‘छोट्या गाड्या…’
मारुती सुझुकीतर्फे दोन नव्या गाड्या या वर्षात देण्यात आल्या आहेत. एक तर मारुती सुझुकी अल्टो के 10 आणि दुसरी म्हणजे मारुती सुझुकी स्विफ्ट (नवे मॉडेल).
मारुती सुझुकी अल्टो के 10 ही 3 नोव्हेंबर 2014 मध्ये नवी गाडी लाँच झाली.

मारुती सुझुकी स्विफ्ट ही गाडी 28 ऑक्टोबर 2014 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. भारतात आतापर्यंत सर्वात जास्त खपाची कार म्हणून हिचा गौरवही करण्यात येतो. या गाडीचे प्रत्येक मॉडेल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. 1197 cc पेट्रोलसाठी तर 1248 cc डिझेलसाठी इंजिन यात बसवण्यात आले आहेत.

टाटा कंपनीकडून काही वर्षांपूर्वीच टाटा नॅनो ही लहान पण आकर्षक अशी नवी गाडी बाजारात आणली होती. केवळ भारतीय लोकांसाठी ही गाडी तयार करण्यात आली आहे. आता याच गाडीचे नवे मॉडेल बाजारात आले आहे.

याव्यतिरिक्त मिनी कूपर एस (नवं मॉडेल), ह्युंदाई एलिट i20 आणि बीएमडब्ल्यू 1 सीरिज यांसारख्या नव्या गाड्याही नव्या फिचरसह बाजारात आल्या आहेत.

आता पाहूयात suv टाईपच्या काही निवडक गाड्या…
महिंद्रा स्कॉर्पिओचं नवं आणि सुधारित मॉडेल आता बाजारात उपलब्ध झाले आहे. आधीपेक्षा अधिक आकर्षक असं याच नवं लूक आहे.

याव्यतिरिक्त रेनॉल्ट डस्टर ऑल व्हिव ड्राईव्ह, फियाट ऍवेंट्युरा, मित्सुबिशी पजेरो स्पोर्ट्स आणि टाटा आरिया यांचे नवे आणि वेगळं दिसणारे मॉडेलही बाजारात आले आहेत.

आता वेळ झाली आहे ते तरुणांच्या हृदयाची धडकन असणार्‍या स्पोर्ट्स बाईकची…
अनेक स्पोर्ट्स बाईक बाजारात आल्या पण गाजल्या त्या काही थोड्याच. त्यात 150 cc चा इंजिन असणार्‍या यामाहा YZF-R15 या बाईकचे नाव घेता येईल. तसेच होंडा CBR150R आणि होंडा CBR250R या गाड्यांचं नाव घेता येईल.

मुलींसाठीही नव्या स्कूटर बाजारात आल्या आहेत.

हीरो प्लेजर ही हीरो कंपनीने नवी स्कूटर लाँच केली आहे. 2014 मध्ये आलेल्या या नव्या स्कूटरमध्ये महिलांसाठी बर्‍याच गोष्टींची सोय केली आहे. उदाहरणार्थ, मोबाईल चार्जिंग पॉइंट, सीटखाली सामान ठेवण्यासाठी मोठी जागा, ओपन सीट आणि साईड स्टँड इंडिकेटर इत्यादी.

वेस्पा S ही पिजिओकडून तयार करण्यात आलेली एक उत्कृष्ट स्कूटर आहे. यात 1970च्या स्टाईलचे चौकोनी हेडलाईट देण्यात आले आहेत. शिवाय डिजिटल घड्याळ, 125 cc इंजिन आहे, ज्यात ऍटोमॅटिक गिअर पडतात…

होंडा ऍक्टिवा 125 नवीन मॉडेल यावर्षीच आलं. याआधीही या प्रोडक्टने मार्केटमध्ये धूम उठवली होती. 125 cc इंजिन, पेट्रोल वाचवणारी, स्पेशल ट्युबलेस टायर, स्ट्राँग मेटल बॉडी, डिजिटल मीटर, खूप काळ चालणारी MF बॅटरी बसवण्यात आली आहे.

TVS स्कूटी झेस्ट, यामाहा रे यांसारख्या काही नव्या स्कूटरही बाजारात आल्या आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close