सुट्यांमध्ये पर्यटकांनी महाबळेश्वरला येणं टाळा

August 12, 2009 12:16 PM0 commentsViews: 8

12ऑगस्टH1N1ची खबरदारी पहाता येत्या 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान पर्यटकांनी महाबळेश्वरला येणं टाळावं असं आवाहन, सातार्‍याचे कलेक्टर विकास देशमुख यांनी केलं आहे. 15 ऑगस्टला जोडून सुट्या घेऊन अनेक पर्यटक महाबळेश्वरला येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सातार्‍याच्या कलेक्टरनी आवाहन केलंय. पाचगणीबरोबरच महाबळेश्वरमधल्या सगळ्या शाळाही 17 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश याआधीच प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.

close