सासवडजवळ पोलिसांच्या गाडीला अपघात, 3 पोलिसांचा मृत्यू

December 28, 2014 12:29 PM0 commentsViews:

Police accident

28 डिसेंबर  : पुण्यातील सासवडजवळच्या पानवडी घाटात आज (रविवारी) सकाळी पोलिसांची नाईट पेट्रोलिंग जीप दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

पोलीस त्यांच्या गाडीमधून रात्रीच्या गस्तीसाठी जात असताना पानवडी घाटात एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी 300 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात तीन पोलीस कर्मचारी जागीच ठार झाले. जखमी पोलिसांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस शिपाई शशिकांत निवृत्ति राऊत, विनाश तुकाराम ढोले, उल्हास अनंत मयेकर, अशी मृतांची नावं आहेत. या सर्व मृतांना पोलिसांनी मानवंदना दिली. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सातार्‍याचे पालकमंत्री विजय शिवतारे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यावेळी उपस्थित होते. तिन्ही पोलिसांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मदत आणि नोकरी देऊ, असं आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close