जंक फूडमुळे समुद्री पक्षांचा जीव धोक्यात

December 28, 2014 4:13 PM0 commentsViews:

28 डिसेंबर  : न्यू इयर सेलिब्रेशनसाठी अलिबागमध्ये समुद्री मार्गाने जाण्याकडे पर्यटकांचा कल वाढत असला तरी सागरी प्रवासांची पर्यटकांची ही हौस समुद्र पक्षांसाठी तापदायक ठरत आहे. समुद्रामार्गे अलिबागला जाणारे पर्यटक समुद्री पक्षांना कुरकुरे आणि त्यासारखे जंक फुड देत असून यामुळे पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असे मत पक्षीतज्ज्ञांनी मांडले आहे.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक पर्यटक समुद्रमार्गे मुंबईहून अलिबागला जात आहेत. पण, हे पर्यटक समुद्रातील सीगल आणि फ्लेमिंगोसारख्या पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांना कुरकुरे आणि त्यासारखं जंक फूड देतात. सीगल आणि फ्लेमिंगो पक्षी हे समुद्रातल्या मास्यांवर आपले जीवन जगत असतात, पण, जंक फूडमुळे पक्ष्यांच्या पचन संस्थेवर परिणाम होत असल्याचे पक्षीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे सागरी प्रवासादरम्यान पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी जंकफूड टाकू नये असे आवाहनही पर्यावरण प्रेमींनी केले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close