पुणे : H1N1चे 1600 पेशंट बरे

August 14, 2009 6:57 AM0 commentsViews: 3

14 ऑगस्ट पुण्यात H1N1चा संसर्ग झालेल्या तब्बल 1600 पेशंटसना उपचार करून घरी पाठवण्यात आलं आहे. H1N1चे बळी ठरलेल्या अनेकांना त्या पूर्वी अनेक आजारांनी ग्रासलं होतं. त्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती कमी झाली आणि H1N1ने त्यांना गाठलं. मात्र बाधा झाल्यानंतरही अनेक पेशंटसनी H1N1चा अतिशय धैर्याने मुकाबला केला.H1N1चा संसर्ग झाल्यामुळे जगण्याची आशा सोडलेले अनेक जण उपचारा नंतर चार दिवसात खडखडीत बरे होऊन घरी परतले आहेत. आणि हा आकडा आहे तब्बल 1600 पेशंटस्‌चा. त्यामुळे बाधित आणि मृतांच्या संख्येचं प्रमाण पाहता H1N1ला घाबरून न जाता धैर्यानं मुकाबला केला आणि काळजी घेतली तर हा आजार जीवघेणा नाही, हेही सिद्ध झालं आहे.

close