बंगळुरमध्ये कमी तीव्रतेचा स्फोट, 2 जखमी

December 28, 2014 11:08 PM0 commentsViews:

Bangalore blast28 डिसेंबर : बंगळुरमध्ये स्फोट झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने हा कमी तीव्रतेचा स्फोट असल्यामुळे मोठी दुर्घटना टळलीये. मात्र या स्फोटात 2 जण जखमी झाले आहे. जखमी पैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. दोन्ही जखमींवर नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

बंगळुर शहरातील चर्च स्ट्रीट परिसरातील एका रेस्टोरेंटजवळ 8.30 च्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात आयईडीचा वापर केला असल्याचं पोलिसांना सांगितलं. घटनास्थळी बॉम्बनाशक पथक पोहचले असून तपास करत आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकेबंदी केली असून कसून तपास सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत फोनवरून घटनेची पूर्ण माहिती घेतली आहे. स्फोटाच्या तपासासाठी केंद्राकडून पूर्ण मदत देण्यात येईल असं सिंह यांनी सांगितलंय. दोन आठवड्यांपूर्वीच भारतीय गुप्तचर विभागाने मध्यप्रदेशमधील जेलमधून पळून गेलेल्या सीमीच्या पाच अतिरेक्यांकडून देशभरा़त घातपाताची शक्यता आहे अशी माहिती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. अशातच बंगळुरमध्ये आज झालेल्या स्फोटामुळे पोलीस यंत्रणेला हादरा बसलाय. या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि दिल्लीत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close