रणजी क्रकेट विजेत्या टीमला दोन कोटीं बक्षिस देणार – बीसीसीआय

August 14, 2009 10:23 AM0 commentsViews: 1

14 ऑगस्टपुढील वर्षापासून रणजी स्पर्धेतली बक्षिसाची रक्कमही वाढवण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्या टीमला दोन कोटी रुपयांचं तर उपविजेत्या टीमला दीड कोटी रुपयांचं घसघशीत बक्षिस देण्यात येणार आहे. रणजी स्पर्धेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्तं बीसीसीआयने या स्पर्धेला ही मोठी भेट दिली आहे. याशिवाय तीन नवी नॅशनल ट्रेनिंग सेंटर्स उभारण्यात येणार आहेत. त्यातलं बॅटिंग प्रशिक्षणाचं केंद्र मुंबईत. फास्ट बॉलिंगचं केंद्र मोहालीत आणि स्पिन बॉलिंगचं, फिल्डिंग केंद्र चेन्नईत सुरु करण्यात येणार आहे.

close