2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगचा समावेश

August 14, 2009 11:34 AM0 commentsViews: 2

14 ऑगस्ट भारतीय महिला बॉक्सर्ससाठी एक चांगली बातमी आहे. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगचा समावेश करण्यात आला आहे. बर्लिनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.बिजींग ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगचा समावेश होऊ शकला नव्हता,पण आता या निर्णयाने आंतरराष्ट्रीय महिला बॉक्सर्स आनंदीत झाल्या आहेत. महिला बॉक्सिंगमध्ये विश्वविजेती ठरलेली आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेती भारतीय बॉक्सर मेरी कॉमनेही या निर्णयाचं स्वागत केल आहे.हा निर्णय म्हणजे माझं स्वप्नंच सत्यात उतरलंय अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.

close