बीड जिल्ह्यात पाण्यासाठी जिवाशी खेळ

December 29, 2014 2:50 PM0 commentsViews:

Beed water story

29 डिसेंबर  :  बीड जिल्ह्यातल्या मुरकुटवाडी गावात एकच सार्वजनिक विहीर… तिनेही तळ गाठलेला… 60 फूट विहिरीत उतरण्याची सोय नाही… त्यामुळे कमरेला दोरी बांधून चिमुरड्यांना आत सोडायचे… हंडा भरल्यावर एका हातात दोरी अन् दुसर्‍या हातात भांडे धरलेल्या मुलांना बाहेर काढायचे… हंडाभर पाण्यासाठी दररोज अख्ख्या गावाचा जीव टांगणीला असतो.

अंबाजोगाई तालुक्यातील मुरकुटवाडी येथील या जीवघेण्या कसरतीवरून मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता समजू शकते. मुरकुटवाडी गावात अजूनही पाणी योजना राबविलेली नाही. एकाच विहिरीवर संपूर्ण गावाला तहान भागवावी लागते. विहिरीत उतरता येत नसल्याने पोटच्या लेकरांच्या कमरेला दोरी बांधून आत सोडायचे. त्यांनी ग्लासाच्या साहाय्याने हंडा भरला की हातातील भांड्यासह त्यांना ओढायचे, असा पालकांचा दिनक्रम असतो. असं म्हणतात की पाणी हे जीवन आहे, पण बीड जिल्ह्यात पाण्याच्या एका हंड्यासाठी जीव धोक्यात घालून लहान मुलांना विहिरीत उतरावं लागत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close