कोल्हापुरात पुन्हा ‘टोल’फोड

December 29, 2014 4:57 PM0 commentsViews:

kol toll

29 डिसेंबर  : कोल्हापूरच्या वादग्रस्त टोलनाक्याची आज पुन्हा एकदा तोडफोड करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली.

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांना काल (रविवारी) शाहू टोल नाक्यावरच्या कर्मचार्‍यांनी धक्काबुक्की केली होती. त्यामुळे आज दुपारी संतप्त स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शिरोली टोलनाक्याची तोडफोड केली आहे. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजीही केली.

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे केलेल्या या आंदोलनामुळे कर्मचार्‍यांनीही टोलनाक्यावरून पळ काढला. या तोडफोडीमध्ये टोलनाक्याचे मोठे नुकसान झाले. आयआरबीचे कर्मचारी टोलसाठी वाहनधारकांना सक्ती करत असल्यानं वादावादीचे प्रकार आजही घडत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close