दुर्देवी अपघातांनी काळवंडलेलं वर्ष…

December 29, 2014 8:15 PM1 commentViews:

Train From Diva- Sawantwadi Ferailed between Nagothane and roha Railway station,Till now 9 passengers have died and 20 are injured On 04/05/2014 PIC/DEEPAK SALVI

अपघात….त्याची भिषणता, दाहकता…शब्दांपेक्षा कल्पना करूनच काळीज धस्स करणारी घटना….निष्पापांच्या जीवांचा आक्रोश…ह्रदय पिळवटून टाकणारं दृश्य….
2014 मध्ये अनेक भीषण अपघात झाले. मुंबई एक्स्प्रेस हायवे हा यावर्षी लोकांसाठी जणू मृत्यूचा सापळाच ठरला. या एक्स्प्रेस हायवेने अनेक लोकांचे जीव घेतले. या वर्षभरातील या दुदैर्वी अपघातांबद्दल….

वर्षाच्या सुरवातीलाच म्हणजे जानेवारीतच माळशेज घाटात एक भीषण अपघात झाला. कल्याण-अहमदनगर महामार्गावर असणार्‍या माळशेज घाटात एसटी 40 फूट दरीत कोसळून अपघात झाला. यात तब्बल 27 प्रवाशी दगावले. सकाळी दहा वाजता माळशेज घाटातील वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि बाजूला असलेल्या 40 फूट दरीत बस कोसळली. ही दुदैर्वी घटना माळशेज घाटातील सर्वात मोठी दुर्घटना असल्याचे बोलले जाते.

लोणावळा आणि खंडाळा घाटात सातार्‍याहून मुंबईला येणारी बस 60 फूट दरीत कोसळली. संध्याकाळी 6.30 ला हा अपघात झाला. यात 20 प्रवासी जखमी झाले तर दोन जणांचा मृत्यू झाला.

त्यानंतर महाराष्ट्राची हक्काची म्हणून पाहिली जाणार्‍या कोकण रेल्वेला अपघाताचे गालबोट लागले. कोकण रेल्वे दिवा-सावंतवाडी पॅसेंजरचे डबे रूळावरून कोसळल्याने भीषण अपघात झाला. रोहा येथे मे महिन्यात पहिल्या आठवड्यात हा अपघात झाला. यात मृतांची संख्या 22, तर 189 जखमी झाले. त्यातील 24 गंभीर जखमी होते. जखमींना मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

मुंबई-गोवा महामार्गावर 25 मे ला रात्री एसटी दरीत कोसळून अपघात झाला. रत्नागिरीतील खेड जवळ हा अपघात झाला. खेडजवळील भोस्ते घाटात कणकवलीकडून मुंबईकडे जाणारी एसटी 100 फूट दरीत कोसळून 36 जण जखमी तर 15 गंभीर जखमी झाले.

तेलंगणातल्या मेदक जिल्ह्यातील अपघातात 14 शालेय विद्यार्थांचा मृत्यू झाला. 24 जुलैला हा अपघात झाला. नांदेड-हैदराबाद पॅसेंजर क्रॉसिंगवर थांबलेल्या स्कूल बसला धडकली आणि ही दुर्घटना घडली.

सोलापूर जिल्ह्यात पहाटे नदीपात्रात बस कोसळून भीषण अपघात झाला. 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या अपघातात 8 जण जागीच ठार झाले. तर 15 जण जखमी झाले. करमाळा-टेंभुर्णी रोडवर शिर्डीहून पंढरपूरला जाणार्‍या खाजगी बसला हा अपघात झाला.

26 ऑक्टोबर रोजी नांदेड-मनमाड पॅसेंजरला रात्री 2 वाजता आग लागल्यामुळे एक डबा पूर्णपणे जळून खाक झाला. औरंगाबाद स्थानकातून निघालेल्या या गाडीला आग लागल्याने प्रवाशांनी आरडाओरडा केला, साखळी ओढून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि सुदैवाने यांत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुणे- सातारा हायवेवर कंटेनर बसला धडकून भीषण अपघात झाला. यात 8 जण जागीच ठार झाले. खंडाळा गावाजवळ हा अपघात झाला. बसस्टॉपवर एक बस थांबली असताना मागून भरधाव वेगात एक कंटेनर आला आणि बसला धडकून उलटला. त्यात 8 जण चिरडले गेले. याआधीही या ठिकाणी 3 वेळा अशा प्रकारचे अपघात झाले आहेत.

या अपघातांच्या मालिकेनं वर्ष काळवंडलं गेलं…
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Pritam Bankar

    This is not something we should revisit.

close