खान आडनावावरुन शाहरुखची अमेरिकेत एअरपोर्टवर चौकशी

August 15, 2009 9:06 AM0 commentsViews: 4

15 ऑगस्ट,बॉलिवूड किंग शाहरूख खानला अमेरिकेत अपमानास्पद वागणूक मिळाली आहे. नेवार्क एअरपोर्टवर शाहरुखला शुक्रवारी चौकशीसाठी थांबवण्यात आलं होतं. दोन तास त्याची कसून चौकशी करण्यात आली. भारतीय दूतावासाच्या हस्तक्षेपानंतरच शाहरूखला एअरपोर्टवरून सोडण्यात आलं. स्वातंत्र्यदिनाच्या एका कार्यक्रमासाठी शाहरुख अमेरिकेत गेला होता. त्यावेळी केवळ खान या आडनावामुळं अमेरिकन अधिका•यांनी शाहरुखला चौकशीसाठी अडवून ठेवलं, अशी माहिती मिळाली आहे. यापूर्वी इरफान खान आणि नील नितिन मुकेश यांनाही वेगवेगळ्या कारणांमुळे एअरपोर्टवर अडवण्यात आलं होतं. इरफान खानला दोनवेळा मुस्लिम असल्याच्या मुद्द्यावरुन तर नील नितिन मुकेशला भारतीय न दिसण्याच्या मुद्यावरुन अडवण्यात आलं होतं.

close