मालेगावमध्ये कॉलराच्या साथीमुळे 12 जणांचा मृत्यू

August 15, 2009 9:18 AM0 commentsViews: 2

15 ऑगस्टदेशभर H1N1च्या संसर्गामुळे चिंतेचं वातावरण असताना मालेगावमध्ये कॉलराच्या साथीने थैमान घातलंय. साथीमुळे आत्तापर्यंत 12 जण दगावले आहेत. त्यात बहुतांश लहान मुलांचा समावेश आहे. आरोग्य विभागात मात्र फक्त तीन मृत्यूंची नोंद दाखवण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसात मालेगाव शहरात 1200 रुग्णांना कॉल•याची लागण झाली आहे. हॉस्पिटलमधले बेड पुरत नाही म्हणून व्हरांड्यात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 700 जण हॉस्पिटलमध्ये आहेत.

close