दुष्काळग्रस्त परिस्थितीने मराठवाड्यात चार आणि पाणी टंचाई

August 15, 2009 9:22 AM0 commentsViews: 7

15 ऑगस्टराज्य सरकारने सध्या 158 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचं जाहीर केलंय. यात मराठवाड्यातले बहुतांश तालुके आहेत.परिस्थिती बिकट बनल्याने नदीनाले कोरडे पडले आहेत तर पिण्याची पाण्याची टंचाई जाणवतेय. पिकांची वाढ खुंटली असून जनावरांच्या चा-याचा प्रश्न निर्माण झालाय. दुष्काळग्रस्त भागात सध्या जेमतेम महिनाभर पुरेल इतकाच चारा उपलब्ध आहे. त्यामुळे गुराढोरांना जगविण्याचा मोठा प्रश्न शेतक•यांसमोर आहे. या समस्या सोडवण्यासाठी सध्या विभागवार बैठका सुरु आहेत.सध्या राजकीय पक्षांपुढे महत्त्वाचा अजेंडा निवडणुकीचा आहे. त्यात निवडणूक आचारसंहिता जाहीर झाली तर दुष्काळाच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्षच होण्याची शक्यता आहे.

close