2009 च्या अखेरपर्यंत देशाचा विकास दर वाढवणार -पंतप्रधान

August 15, 2009 2:18 PM0 commentsViews: 2

15 ऑगस्ट2008 मध्ये जागतिक मंदीमुळे कमी झालेला भारताचा विकास दर 2009 च्या अखेरपर्यंत वाढवणार असं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. भारताच्या 62 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झालं.ध्वजारोहणानंतर पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी देशाला उद्दद्ेशून भाषण केलं. देशाचा आर्थिक विकासदर वाढवण्याबरोबरच, कृषीक्षेत्राचा प्रामुख्याने विकास करण्याचं उद्दिष्ठ राष्ट्राच्या डोळ्यासमोर असल्याचंही मनमोहनसिंग यांनी म्हटलं. भारतीय अर्थव्यवस्था 2009 संपेपर्यंत परत वाढणार असं त्यांनी आश्वासन दिलं. आपण इतर देशांपेक्षा चांगलं असल्याचा ही दावा त्यांनी केला. प्राणाचं मोल देऊन मिळवलेल्या स्वातंत्र्यांचा आपल्याला अभिमान आणि गर्व पाहिजे, असं सांगून पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी अनेक मुद्द्यांनाही स्पर्श केला.त्यांनी देशवासियांना स्वाईन फ्लूला न घाबरण्याचं आवाहन करत सरकार या संकटाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचंही आश्वासन दिलं. अतिरेक्यांबरोबरच नक्षलवाद्यांचाही धोका वाढत आहे, त्यासाठी सगळ्यांनीच एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे, असं आव्हानही पंतप्रधानांनी केलं. याचवेळी भारताच्या युवकांकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा असल्याचंही ते म्हणाले.

close