आमिरच्या ‘पीके’चा वाद सुरूच

December 31, 2014 12:12 PM1 commentViews:

PK nmerkej

31 डिसेंबर  :  अभिनेता अमिर खानच्या बहुचर्चित ‘पीके’ चित्रपटाविरोधात बजरंग दल आक्रमक झाली असून, हिंदु सेना आणि बजरंग दलाच्या वतीने मंगळवारी मध्य दिल्लीत चित्रपटगृहाबाहेर निदर्शने करण्यात आली. या वेळी संघटनांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी चित्रपटाचे पोस्टर जाळले, तसेच पुण्यातील गुडल्क चौकातही काल (मंगळवारी) हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘पीके’च्या विरोधात निदर्शने करण्यात आली. या वेळी संघटनांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी चित्रपटाचे पोस्टर जाळले, त्याचबरोबर घोषणाबाजीही केली. अमिर खानच्या पीके चित्रपटा हिंदु धर्मातील साधू-संताचा आणि हिंदु धर्माचा अपमान करण्यात आला तसेच लव जिहादच उदातीकरण करण्यात आलं, असं हिंदु जनजागृती समितीच म्हणणं आहे. ‘पीके’ चित्रपटावर बंदी आणावी आणि सेन्सॉर बोर्ड बरखास्त करण्यात यावा अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने यावेळी केली आहे.

‘पीके’विरोधात हिंदु संघटना निदर्शनं करत असताना, बॉलीवूड मात्र ठामपणे ‘पीके’ सिनेमाच्या समर्थनार्थ पुढे आलं आहे. हा एक उत्तम चित्रपट असल्याचं सलमान खाननं म्हटलं आहे. तर करण जोहरनेही सेन्सॉरने मंजूर केलेल्या चित्रपटावर हल्ले करणे थांबवले पाहिजे! कोणत्या प्रकारच्या लोकशाहीत आपण राहतोय? कोणत्याही चित्रपटाला अशा प्रकारे लक्ष्य केलं जाता कामा नये…’ असं ट्विट केलं आहे.

शेखर कपूरने चित्रपटाचं कौतुक करताना आध्यात्मिक गुरूंचाही मान राखलाय. ‘पीके’ मला अतिशय मनोरंजक वाटला. पण आपल्या आध्यात्मिक नेत्यांनी आपल्या लोकांसाठी केलेल्या उत्कृष्ट कामाचंही मला कौतुक वाटतं.

दरम्यान, चित्रपटाचा दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी आज एक निवेदन प्रसिद्ध केलं. त्यात त्यानं म्हटलंय की, काही संघटनांनी ‘पीके’विरोधात केलेल्या निदर्शनांमुळे मला दु:ख झालं आहे. ‘पीके’च्या संपूर्ण टीमतर्फे मी हे स्पष्ट करतो की आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. आमचा चित्रपट संत कबीर आणि महात्मा गांधींच्या विचारावर आधारित आहे. पृथ्वीवरील सर्व मानव समान आहेत असा विचार या चित्रपटात मांडण्यात आला आहे. त्यांच्यात कोणताच भेदभाव नाही.’ असं म्हटलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • RAVI

    IN one part of film Bhagawan Shankar shown in Toilet and crawling behind chairs.. Can u imagine or dare to show Mohamed paigamber or Jejus at his place….SECOND the guy whom the actress love shown as Pakistani Muslim.. Why not Indian Muslim…’
    We have to accept Pakistan is our Enemy… Visit border or Kashmir once in Life…

close