कुत्र्याच्या हल्ल्यातून 10 वर्षांच्या भावाने वाचवला बहिणीची जीव

December 31, 2014 8:55 AM0 commentsViews:

31 डिसेंबर : अहमदाबादमध्ये एका 10 वर्षांच्या मुलाने आपला जीव धोक्यात घालून आपल्या बहिणीची कुत्र्याच्या हल्ल्यातून सुटका केली. त्याची ही झुंज 23 डिसेंबरला सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे.

अहमदाबादच्या मकरबा भागातल्या एका सोसायटीत संध्याकाळच्या वेळी 10 वर्षांचा कशिश आपल्या दीड वर्षाच्या बहिणीबरोबर खेळत होता. त्यावेळी त्याच्या शेजारच्या अल्सेशियन कुत्र्याने त्या लहान चिमुरडीवर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरून न जाता लहान कशिश या प्रसंगाला धीराने सामोरे गेला आणि प्रसंगावधान बाळगून कशिशने एकट्याने आपल्या बहिणीला वाचवलं. या घटनेनंतर मकरबा भागात एकच खळबळ उडाली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close