देशाला दहशतवाद्यांचाच जास्त धोका- पंतप्रधान

August 17, 2009 8:14 AM0 commentsViews: 6

17 ऑगस्ट देशाला सीमेपलीकडील अतिरेक्यांचाच जास्त धोका असल्याचं मत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिल्लीतल्या बैठकीत व्यक्त केल आहे. सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यां बरोबर झालेल्या बैठकीत त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. येत्या काही दिवसांत साजरे होणारे सार्वजनिक उत्सव आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा राज्यांसाठी महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा आहे, असंही पंतप्रधानांनी सांगितल. म्हणुन राज्यांनी सुरक्षेची अधिक काळजी घ्यावी अशीही सूचना त्यांनी केलीये. प्रत्येक वेळी लष्करावर विसंबण्यापेक्षा राज्याराज्यातील पोलीस दल सुसज्ज करण्यावरच जास्त भर देणार असल्याचंही मनमोहनसिंग यांनी सांगितलं.

close