जयराज फाटकांच्या विरोधातील अविश्वास ठराव बारगळला

August 17, 2009 9:10 AM0 commentsViews: 1

17 ऑगस्ट पालिका आयुक्त जयराज फाटक यांच्या विरोधातील अविश्वास ठराव बारगण्याची शक्यता आहे. शाळांना सुट्टी देण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली होती. पण आयुक्तांनी ती फेटाळून लावली होती. त्यामुळे सभागृहाचा अवमान झाला असा दावा करत नगरसेवकांनी आयुक्तांना मंत्रालयात परत पाठवू, अशी भूमिका घेतली होती. मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी आयुक्त जयराज फाटक यांच्याबाबत घुमजाव केल्याचं दिसतं. आयुक्तांंवर अविश्वासाचा प्रस्ताव आणण्याचा गाजावाजा राजहंस सिंह यांनी केला होता. त्यांना शिवसेनेचीही साथ होती. पण वरिष्ठांकडून कानपिचक्या मिळाल्यानंतर मात्र राजहंस सिंह यांनी अळीमिळी गुपचिळी अशी भूमिका घेतली आहे. वरिष्ठांशी बोलून ठरवू असं ते गेल्या चार दिवसांपासून सांगत आहे.

close