राज्यात लवकरच नव्या लोकायुक्तांची नेमणूक -मुख्यमंत्री

December 31, 2014 6:30 PM0 commentsViews:

cm on depcm3431 डिसेंबर :

राज्यामध्ये नवीन लोकायुक्त नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सरन्यायाधीशांच्या सूचनांनुसार प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसंच सध्यातरी एकाच लोकायुक्ताची नेमणूक होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यात गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या लोकायुक्तांच्या नेमणुकीबाबत राज्य सरकार आता कामाला लागले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यात लोकायुक्ताची मागणी केली होती. अखेरीस याची दखल घेत तत्कालिन आघाडी सरकारने लोकायुक्त विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला पण हे विधेयक कागदावरच राहिले. राज्यात लोकायुक्त आहेत पण त्यांना अधिकार नसल्यामुळे 2011 साली देवेंद्र फडणवीस आमदार असतांना खासगी लोकायुक्त विधेयक मांडले होते. आता भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकायुक्त नेमणुकीसाठी पुढाकार घेतला आहे. नवीन लोकायुक्त नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सरन्यायाधीशांच्या सूचनांनुसार प्रक्रिया सुरू झाली आहे. सरन्यायाधीशांच्या सूचनांनुसार सध्यातरी एकाच लोकायुक्ताची नेमणूक केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. पण सध्यातरी एकाच लोकायुक्ताची नेमणूक होणार आहे. पण लोकायुक्त कायद्यात दुरुस्ती होणार का, याचं उत्तर द्यायचं मात्र त्यांनी टाळलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close