जगाच्या पाठीवर नव वर्षाचं धडाक्यात स्वागत

December 31, 2014 8:13 PM0 commentsViews:

31 डिसेंबर : बघता बघता..2014 हे वर्ष आता काही तासांत संपणार असून नव्या वर्षात काही तासांतच आपण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. पण म्हणतात की, ‘दुनिया गोल हे’ म्हणूनच जगाच्या पाठीवर 2014 हे वर्ष संपलंही आहे. अतिपूर्वेकडच्या देशांमध्ये आता सरतं वर्ष संपलंय आणि नवीन वर्षाचा जल्लोष सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियात नव्या वर्षाच्या स्वागताचा माहौल एकदम रंगीबेरंगी असतो. ऑस्ट्रेलियातील सिडनीत 2014 ला निरोप देत नव्या वर्षाचं डोळे दिपून टाकतील अशा फटाकांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आलंय. तर न्यूझीलंडमधल्या ऑकलंड शहरात नव्या वर्षांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close