ओसियन बोल्टचा 100 मीटरमध्ये नवा रेकॉर्ड

August 17, 2009 9:15 AM0 commentsViews: 4

17 ऑगस्ट शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत बोल्टने स्वत:चाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. 22 वर्षांच्या बोल्टने 100 मीटर्सचे अंतर 9.58 सेकंदात पार केलं आहे. जर्मनीत बर्लिन इथे सुरु असलेली ऍथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप गाजवली. याआधीचा त्याचा रेकॉर्ड 9.69 सेकंदांचा होता. गेल्यावर्षी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्याने हा रेकॉर्ड केला होता. गतविजेता टायसन गे 9.71 सेकंदांची वेळ नोंदवत दुसरा आला. तर जमैकाचा असाफा पॉवेलने ब्राँझ मेडल पटकावलं. त्याने 9.84 सेकंदांची वेळ घेतला.

close