बर्निंग कार

December 31, 2014 8:43 PM0 commentsViews:

मुंबईत भांडुप इस्टर्न एक्स्प्रेस हाय वेवर आज दुपारी साडेतीनच्या सुमारास एका एस्टीम कारला आग लागली. ही कार इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून भांडुप सोनापूरकडे जात होती. नाहुर स्टेशन सोडल्यानंतर अचानक या गाडीने पेट घेतला. आग मोठी असल्यामुळे फायर ब्रिगेडची गाडी पोहचेपर्यंत कार जळून ख़ाक झाली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. या आगीमुळे मुलुंडकड़े जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close