आजच दारूचा ट्रक उलटला

December 31, 2014 8:50 PM0 commentsViews:

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी तळीरामांनी ‘साठा’ आणि ‘कोटा’ दोन्हीची जय्यत तयारी करत असता यात शंका नाही. पण तळीरामांना हवीहवीशी असणारी दारू रस्त्यावर पाण्यासारखी वाहून जात असल्याचं दृश्य आज पाहण्यास मिळालं. ठाण्यातल्या खारेगाव टोल नाक्यावर दारूची वाहतूक करणारा ट्रक अपघातग्रस्त झाला. यामुळे रस्त्यावर दारूचे बॉक्स पडले. या अपघातात कुणीही जखमी झालं नाही. पण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणण्यात आलेल्या दारूचे बॉक्स मात्र फुटले. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहतूक नियंत्रणात आणली. नंतर दारूचे बॉक्स दुसर्‍या वाहनात भरण्याचं काम सुरू झालं. पोलिसांनी बंदोबस्त केल्यामुळे दारूची पळवापळ मात्र टळली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close