सीएसटी रेल्वेस्टेशन पुर्ववत

August 17, 2009 9:18 AM0 commentsViews: 3

17 ऑगस्टदोन दिवसांपासून बंद असलेलं सीएसटी रेल्वेस्टेशन सुरु झालं. मस्जिद स्टेशनजवळचा ब्रिटीशकालीन पूल तोडण्यासाठी रेल्वेने हा दोन दिवसांचा मेगाब्लॉक घेतला होता. यासाठी सेंट्रल तसंच हार्बर मार्गावरच्या सीएसटी ते भायखळा आणि सीएसटी ते वडाळा दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. तर लांब पल्ल्याच्या गाड्या दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस इथून सोडण्यात येत होत्या. आता सर्व गाड्यांची वाहतूक सुरळीत झाली आहे. पूल पाडल्यानंतर रेल्वेने 35 वॅगन डेब्रिज आणि स्टील रेल्वेनं उचललं आहे. मस्जिद बंदर स्टेशनचे 1, 2, 3, 4 नंबरचे प्लॅटफार्म 12 डब्यांच्या गाड्यांसाठी वाढवण्याचंं काम या दोन दिवसात करण्यात आलंय. तसंच सीएसटी स्टेशनवर 24 डब्यांच्या गाड्यांसाठी 16, 17, 18 नंबरचे प्लॅटफॉर्म वाढवण्याच येणार आहेत.

close