मेडिकल टेस्टसाठी आसाराम बापू दिल्लीत

January 1, 2015 10:41 AM0 commentsViews:

Asaram Babu

01 जानेवारी :  स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूला आज दिल्लीत आणण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून आसारामची तब्येत खराब असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे काही टेस्टसाठी आसारामला एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

आसारामवर सुरतच्या आश्रमताल्या एका तरूणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याला तात्पुरता जामीन देण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मेडिकल टेस्टचे आदेश दिले आहेत. त्यानूसार 17 पोलीस अधिकार्‍यांच्या टीमसोबत आसारामला रेल्वेने दिल्लीत आणण्यात आले. आसारामच्या समर्थकांनी कोणत्याही प्रकारचा गोंधळ घालू नये याची देखील काळजी घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली.

दरम्यान आसाराम बापू दिल्लीत येणार असल्याची माहिती मिळताच त्याच्या समर्थकांनी दिल्लीतल्या रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती. अनेकांनी आसाराम बापूच्या सुटकेचीही मागणी केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close