राष्ट्रपतींच्या चार बॉडीगार्ड्सवर सामुहिक बलात्काराचा आरोप

August 17, 2009 3:20 PM0 commentsViews: 5

17 ऑगस्ट2003 च्या बुद्धजयंती पार्क सामुहिक बलात्कार खटल्या प्रकरणी सोमवारी दिल्ली कोर्टात चारजणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. हे चारही आरोपी हरपित सिंग, सत्येंद्र सिंग, कुलदिप सिंग आणि मनिश कुमार हे कॅव्हेलियर गार्ड्स मधील राष्ट्रपतींचे बॉडी गार्ड्स होते. त्यांच्यावर इंडियन पीनल कोड अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण हे आरोपी सुप्रिम कोर्टात अपील करणार असल्याचं डिफेन्स लॉयर रणबीर सिंग यांनी सांगितलं. आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी नसल्याचंही त्यांनी सांगितलं. दिल्ली विद्यापीठातील 17 वर्षीय विद्यार्थीनी आपल्या मैत्रीणीबरोबर राष्ट्रपती भवनाजवळच्या बागेत गेली असताना 6 ऑक्टोबर 2003 रोजी सत्येंद्र आणि हरपीतने तिच्यावर बलात्कार केला आणि इतर दोघांनी घटनास्थळी पहारा द्यायचं काम केलं. सत्येंद्र आणि हरपित यांच्यावर सामुहिक बलात्कार तसंच चोरीचा आरोप टेवण्यात आला असून कुलदिप आणि मनिश यांच्यावर चोरी, दरोडा आणि या कटात सहभागी असल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत .या खटल्याची पुढची सुनवाई 22 ऑगस्ट 2009 ला करण्यात येणार आहे.

close