मुंबई कबड्डी संघटनेच्या निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप

January 1, 2015 4:50 PM0 commentsViews:

mumbai kabbadi01 जानेवारी : मुंबई शहर कबड्डी संघटनेच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप छत्रपती पुरस्कार विजेते आणि राष्ट्रीय कबड्डीपटू सूर्यकांत भोईटे आणि अनिल घाटे पॅनल यांनी केलाय. बोगस मतदान, बोगस संघ, निवडणूक अधिकार्‍यांनी सर्व गैरप्रकारांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आलाय.

मुंबई कबड्डी संघटनेच्या निवडणुकीत 200 च्या वर बोगस संघांची नोंद करण्यात आली. आणि त्यांच्या बोगस प्रतिनिधींनी मतदान केल्याचा आरोप अनिल घाटे पॅनलनी केलाय. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते आणि मुंबई कबड्डी संघटनेचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या पॅनलचा विजय झालाय. त्यांच्या पॅनलमध्ये अनेक राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. तर दुसरीकडे अनिल घाटे पॅनलमध्ये कबडीपट्टू असतांनाही त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय. नियमांनुसार कोणत्याही पॅनलमधील खेळाडूंना मतदान करण्याचा अधिकार असतो. पण मतदान प्रक्रियेत खेळाडूंना डावलण्यात आलं. बोगस मतदान, बोगस संघ, निवडणूक अधिकार्‍यांनी सर्व गैरप्रकारांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आलाय. दरम्यान, भाई जगताप यांनी भोईटे यांचे आरोप फेटाळून लावले आहे. निवडणुका या संघटनेच्या नियामानुसारच झाल्या आहे असा दावा जगताप यांनी केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close