‘त्या’ जेरबंद बिबट्याचा मृत्यू

January 1, 2015 6:23 PM0 commentsViews:

kolhapur_bibtya01 जानेवारी : कोल्हापूर शहरातील रुईकर कॉलनीत पकडण्यात आलेल्या बिबट्याचा दुर्देवी मृत्यू झालाय. आज (गुरुवारी) सकाळी या बिबट्याला पकडण्यात आलं होतं. त्याला चांदोली अभयारण्यात नेताना वाटेत मृत्यू झाला. बिबट्याचा मृत्यू का झाला याचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही.

शहरातील रुईकर कॉलनीच मध्यवर्ती भागात अचानक बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली होती. खासदार धनंजय महाडीक यांच्या बंगल्याच्या बाजुच्या बंगल्यात बिबट्या शिरला होता. सकाळी 7 वाजता फिरायला जाणार्‍या नागरिकांना या बिबट्याचं दर्शन झालं होतं. घटनास्थळी पोलीस आणि वनधिकार्‍यांनी पाचारण केलं. मात्र, बघ्यांच्या गर्दीमुळे बिबट्याला पकडण्यात अनेक अडथळे आले. पण वनविभाग आणि पोलीस कर्मचार्‍यांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आलं होतं. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. पण या बिबट्याला जेरबंद केल्यानंतर चांदोली अभयारण्यात नेण्यात येणार होतं. वनअधिकार्‍यांच्या बेशुद्ध बिबट्याला अभयारणाकडे जात असतांना अचानक वाटेतच बिबट्याचा मृत्यू झाला. हा बिबट्या बर्‍याच दिवसांपासून उपाशी होता. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज बांधला जात आहे. मात्र याबाबत वनअधिकार्‍यांनी अजून कोणताही खुलासा केलेला नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close