‘आघाडी सरकारने मंजूर केलेल्या 1100 कोटींच्या निविदा रद्द’

January 1, 2015 9:19 PM0 commentsViews:

girish_mahajan01 जानेवारी : जलसंपदा खात्यात टक्केवारीची बजबजपुरी झाल्याचा गौप्यस्फोट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय. तसंच आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेल्या 1100 कोटी रुपयांच्या निविदा रद्द केल्या आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. गिरीश महाजन पालकमंत्री म्हणून नाशिकला आले असता ते बोलत होते.

आघाडी सरकारच्या काळात निवडणुकीपूर्वी मंजूर केलेल्या 1100 कोटी रुपयांच्या निविदा रद्द केल्या असून त्यांची चौकशी सुरू असून दोषी आढळणार्‍या संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा गिरीश महाजन यांनी दिला. आघाडी सरकारच्या काळात झालेल्या गैरप्रकारांबाबत येत्या महिना दोन महिन्यात आणखी काही गौप्यस्फोट करणार असल्याचंही महाजन यांनी स्पष्ट केलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close