…मग महाजन लाच देणार्‍यांची नावं जाहीर का करत नाही ?-मलिक

January 1, 2015 11:39 PM1 commentViews:

navab_malik01 जानेवारी : आघाडी सरकारच्या काळातील विविध कामांच्या या निविदा कायम ठेवण्यासाठी संबंधित ठेकेदार आणि दलालांनी आपणाला 200 कोटींची ऑफर दिली होती असं जर गिरीश महाजन दावा करत असतील तर गिरीश महाजन त्यांची नावे का जाहीर करत नाहीत, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय.

काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात जलसंपदा खात्यात विविध कामांच्या या निविदा कायम ठेवण्यासाठी संबंधित ठेकेदार व दलालांनी आपणाला 200 कोटींची ऑफर दिली असा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केला होता. गिरीश महाजनांची भूमिका संशयास्पद असून खरे सत्य जनतेसमोर आणण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. याबाबत नवाब मलिक म्हणाले, जर गिरीष महाजनांना कोणी अशा प्रकारे लाच देण्याचा प्रयत्न केला होता; तर सरकार मधील एक जबाबदारी व्यक्ती म्हणून त्याची माहिती लाचलुचपत विभागाला देणे हे त्यांचे पहिले कर्तव्य होते. परंतु त्यांनी याप्रकरणाची (एसीबी) लाचलुचपत विभागाकडे तक्रार का केली नाही?, महाजनांना लाच देऊ पाहणारे कंत्राटदार हे त्यांच्या पक्षाशी लागेबांधे असणारे असल्यानेच ते कंत्राटदारांची नावे जाहीर करत नसल्याची आम्हाला शंका आहे. एकंदरीतच हे सर्व प्रकरण संशयास्पद असून महाजनांना लाच देणारी लोकं कोण आहेत,यातील खरे सत्य काय आहे हे जनतेसमोर आणण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • SVKNet

    Malik che naav nakki asnar :)

close