सुरक्षा रक्षक पुरवण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोटरमनचं आंदोलन मागे

January 2, 2015 1:11 PM0 commentsViews:

Moterman

02  जानेवारी :  मध्ये रेल्वेमार्गावर शुक्रवारी प्रवाशांनी लोकल ट्रेनवर केलेल्या दगडफेकीनंतर मोटरमन्सनी पुकारलेल्या आंदोलन मागे घेतल आहे. पुरेशी सुरक्षा पुरवण्याचं आश्‍वासन दिल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं आहे. 

 दिवा स्टेशनमधील दगडफेकीत मोटरमन जखमी झाल्यानंतर मध्य रेल्वेवरील मोटरमन्सनी शुक्रवारी दुपारी सीएसटी स्थानकात आंदोलनाचा पवित्रा घेतला. लोकल जेथे आहे तिथेच सोडून मोटरमन निघून गेल्याने मध्य रेल्वेबरोबरच हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे टिळकनगर स्थानकात संतप्त रेल्वे प्रवाशांनी एटीव्हीएम मशीनची तोडफोड केली.

शुक्रवारी सकाळी ठाकुर्ली इथं पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी दिवा स्थानकात रेल रोको आंदोलन केले. जमावाने केलेल्या दगडफेकीत मोटरमनही जखमी झाला. ही माहिती समजताच मोटरमन्सनी सीएसटी स्थानकात दुपारी आंदोलनाचा पवित्रा घेतला. लोकल गाड्या सोडून मोटरमन आंदोलनात सहभागी झाल्याने काही काळासाठी हार्बर आणि मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे हार्बर मार्गावरील टिळकनगर स्थानकात प्रवाशांचा उद्रेक झाला. काही प्रवाशांनी एटीव्हीएम मशीन रेल्वे रुळांवर आणून त्याची तोडफोड केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close