कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात जनहीत याचिका दाखल

August 18, 2009 9:26 AM0 commentsViews: 75

18 ऑगस्ट कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात आता नागपूर हायकोर्टात जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे. थोरात यांनी महाराज बागेतल्या प्राणी संग्रहालयातल्या पिंजर्‍यात जाऊन वाघासोबत फोटो काढले होते. त्यावर बरीच टीकाही झाली होती. आता सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे यांच्या 'पर्यावरण मित्र' या संघटनेनं त्यांच्या विरोधात हायकोर्टात तक्रार दाखल केली आहे. याबाबतची सुनावणी 24 तारखेला होण्याची शक्यता आहे. याआधी शिवसेनेही थोरात यांच्याविरूध्द पोलिसात तक्रार दाखल केली होती. दरम्यान वनविभागानेही प्राणीसंग्रहालयात जाऊन घटनेची खातरजमा केली आहे.

close