रिपब्लिकन पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार

August 18, 2009 11:01 AM0 commentsViews: 5

18 ऑगस्ट आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय रिपब्लिकन पक्षानं घेतला आहे. मंगळवारी रिपब्लिकन नेत्यांची मुंबईत बैठक झाली. त्यानंतर रामदास आठवले यांनी याबाबतची माहिती दिली. आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहिल्याने सत्तेत भागीदारी मिळाली. पण पक्ष बळकट करता आला नाही, अशी खंतही आठवले यांनी व्यक्त केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता कुणाच्याही मागे फरपटत जाण्यापेक्षा, स्वतंत्रच लढणार असल्याचं सर्व नेत्यांनी एकमताने ठरवल्याचं आठवलेंनी यांनी सांगितलं आहे. सर्व मागासवर्गीय जातींना रिपब्लिकन पक्षात एकत्र करून पक्ष बळकट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

close