ज्येष्ठ शास्त्रज्ञ हरपला, डॉ. वसंत गोवारीकर कालवश

January 2, 2015 5:27 PM0 commentsViews:

vasant_gowarikar02 जानेवारी : ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर युरीनरी इन्फेक्शन, चेस्ट इन्फेक्शन आणि डेंग्यूसाठी उपचार सुरू होते. आज सकाळी साडेअकराच्या सुमाराला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज संध्याकाळी पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी अवकाश संशोधन, हवामान शास्त्र यामध्ये मोलाचं योगदान दिलं होतं.

डॉ. वसंत गोवारीकर यांचं अवकाश संशोधन, हवामान शास्त्र यात मोलाचं योगदान लाभलंय. लोकसंख्या क्षेत्रांतील संशोधनात्मक अभ्यास केला त्यावर त्यांचे आय प्रेडिक्ट हे लोकसंख्येवर भाष्य करणारं पुस्तक प्रसिद्ध झालं. इंग्लंडमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी पीएचडी घेतली. तसंच प्रवाही पदार्थावर गार्नर-गोवारीकर थिअरी त्यांनी मांडली होती. केंब्रिज, ऑक्सफर्डमध्ये डॉक्टरेटसाठी परीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. अमेरिकेत समरफिल्ड रिसर्च सेंटरमध्ये क्षेपणास्त्रातील मीटरचे संशोधन करण्यासाठी त्यांना सन्मानाने बोलवून घेण्यात आलं होतं. 1965-1965 साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेमध्ये वसंतराव व विक्रम साराभाई उपग्रह तंत्रज्ञानावर काम केलं. गोवारीकर यांनी त्रिवेंद्रमला थुंबा येथील अवकाश संशोधन प्रयोगशाळेचे प्रमुखपदही भुषवलं होतं.17 एप्रिल, 1983 रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली एस.एल.व्ही. 3 हा उपग्रह वाहक कार्यान्वित झाला. त्यानंतर त्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिवपदही भुषवलं. 1991 ते 1993 या दरम्यान ते पंतप्रधानांचे विज्ञान सल्लागार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली हवामानाचा अंदाज, तंत्रज्ञांना उद्योजक बनवण्याच्या योजना, परदेशस्थ भारतीय संशेधकांना परत आणणे, सरकारचे विज्ञान धोरण ठरविणे व त्याचा प्रसार करणे ही कामे प्रामुख्याने झाली. पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपदही भुषवलं. 1994-2000 या दरम्यान गोवारीकरांनी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्षपदही भुषवलं.- पद्मश्री, फाय फाउंडेशन पारितोषिक, नायक सुवर्णपदक ,अनेक विद्यापीठांच्या डॉक्टरेट्स आदी मानसन्मानांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

गोवारीकर यांचा अल्पपरीचय

अवकाश संशोधन आणि हवामानशास्त्र यामध्ये योगदान
इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम विद्यापीठातून पीएचडी
प्रवाही पदार्थांबद्दलच्या संशोधनाबद्दल गार्नर-गोवारीकर थिअरी
केंब्रिज, ऑक्सफर्डमध्ये डॉक्टरेटसाठी परीक्षक म्हणून नियुक्ती
अमेरिकेत समरफिल्ड रिसर्च सेंटरमध्ये क्षेपणास्त्रातल्या मीटरचे संशोधन करण्यासाठी निमंत्रण
1965 साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेमध्ये विक्रम साराभाईसोबत उपग्रह तंत्रज्ञानावर काम
केरळमधल्या थुंबा इथल्या अवकाश संशोधन प्रयोगशाळेचं प्रमुखपद
17 एप्रिल, 1983 – डॉ. गोवारीकर यांच्या नेतृत्वाखाली एस.एल.व्ही.-3 हा उपग्रह वाहक कार्यान्वित
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचं सचिवपद
1991 ते 1993 या दरम्यान पंतप्रधानांचे विज्ञान सल्लागार
1995 -1998 पुणे विद्यापीठाचे कुलगुरू
1994-2000 – मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद
राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष
आय प्रेडिक्ट हे लोकसंख्येवर भाष्य करणारं पुस्तक

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close