जात धर्म पंथ यावरून सुरक्षेचा त्रास नको

August 18, 2009 11:06 AM0 commentsViews: 6

18 ऑगस्ट सुरक्षेबाबत सर्व उपाय केले पाहिजेत, पण जात, धर्म, रंगावरून त्रास व्हायला नको ही माझी भूमिका आहे असं शाहरूखनं म्हटलंय. तसंच हा पब्लिसिटी स्टंट नव्हता असंही त्याने स्पष्ट केलंय. अमेरिकेवरुन शाहरूख मंगळवारी भारतात परतला. मुंबईतल्या मन्नत या त्याच्या निवासस्थानी शाहरूखनं पत्रकार परिषद घेतली आणि या सगळ्या प्रकरणाचा खुलासा केला. शाहरूखला नेवार्क विमानतळावर दोन तास चौकशीसाठी थांबवण्यात आलं होतं. पण भारतीय दूतावासाच्या हस्तक्षेपानंतरच त्याला एअरपोर्टवरून सोडण्यात आलं. शाहरूखची तब्बल दोन तास चौकशी करण्यात आली होती. शाहरूख अमेरिकेत स्वातंत्र्यदिनानिमित्त एका कार्यक्रमासाठी गेला होता. या सगळ्या प्रकरणावरून सर्वत्र चर्चा सुरू होती. शाहरूखलाही या गोष्टीचा खूप मनस्ताप झाला होता. आणिअखेर शाहरूख आता भारतात परतला आहे. दरम्यान या सगळ्यावर समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंग यांना मात्र हा एक पब्लिसीटी स्टंट असल्याचं वक्तव्य केलं आहे.

close