जलदिंडीचा उत्सव थाटामाटात

January 2, 2015 10:00 PM0 commentsViews:

02 जानेवारी :  तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव गेल्या 5 दिवसांपासून सुरू आहे. याच शाकंभरी नवरात्र महोत्सवातल्या महत्वाचा मानला जाणारा जलदिंडीचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला. 2 ते 3 हजार महिलांनी या उत्सवासाठी हजेरी लावली. तुळजापुरातल्या पापनाश आणि इंद्रायणी या कुंडांतून पाणी आणून ते देवीच्या पायांवर ओतलं जातं. नंतर या महिलांना साडी चोळी अहेर म्हणून दिली जाते. शताक्षी देवी आणि गुरु राक्षस या दोघात युद्ध सुरू असताना शताक्षी देवीचे सर्व मंत्र गुरू राक्षसाने हरण केले होते. यावेळी तुळजाभवानी देवीने गुरू राक्षस वध केला अशी आख्यायिका आहे. त्यावरूनच हा जलदिंडीचा उत्सव साजरा केला जातो. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close