‘जेजे’च्या सीनिअर डॉक्टर्सचं सामूहिक रजा आंदोलन

August 20, 2009 7:21 AM0 commentsViews: 2

20 ऑगस्ट मुंबईतील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध असलेल्या जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या सिनियर डॉक्टर्सचं एक दिवसाचं सामूहिक रजा आंदोलन सुरु आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी हे आंदोलन असल्याची माहिती महाराष्ट्र मेडिकल टीचर्स असोसिएशनच्या प्रवक्त्या डॉ. भारती कोंडविलकर यांनी दिली. या आंदोलनामुळे जेजे, कामा, जीटी आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटल या सर्व हॉस्पिटलमधली ऑपरेशन्स रद्द करावी लागली आहेत, अशी प्रतिक्रिया जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे डीन डॉ. आर. एस. इनामदार यांनी दिली. कॅबिनेटच्या बैठकीत मेडिकल टीचर्सच्या सहाव्या वेतन आयोगाचा निर्णय होण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. युजीसीप्रमाणे सहावा वेतन आयोग देण्याची सरकारी डॉक्टरांची मागणी आहे. बीएमसीनेही युजीसीनुसार सहावा वेतन आयोग दिल्याचं संघटनेने सांगितलं आहे.

close