शाब्बास रे भूमिपुत्रांनो, बळीराजाच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

January 2, 2015 10:22 PM0 commentsViews:

 

02 जानेवारी : यंदा राज्यात शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यात झाल्यात. या बातम्या वाचून सारेच हळहळतात. त्याचवेळेला काही हात मदतीसाठी पुढेही येतात. असंच उदाहरण मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये बघायला मिळतंय. नोकरीसाठी गाव सोडावं लागलेल्या 50 संगणक अभियंत्यांनी मराठवाड्यातील 50 आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 हजारांची आर्थिक मदत केलीये. तसंच त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारीही उचललीये. ही तरुण मुलं पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू अशा महानगरांमध्ये खासगी कंपन्यांमध्ये नोकर्‍या करतात. प्रत्येक जिल्ह्यात आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी हे युवक जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांना बरोबर घेऊन ही मदत करत आहेत. सरकारच्या मदतीची वाट पाहणार्‍या या कुटुंबांना मोठाच धीर मिळालाय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close