मुंबई टू शांघाय, तिसरी मुंबई आणि मेट्रोचं जाळं वाढणार !

January 3, 2015 2:17 PM0 commentsViews:

mumbai_mmrda03 जानेवारी : नवीन वर्ष आहे…सरकारही नवीन…त्यामुळेच नव्या सरकारने मुंबईसाठी अनेक नवे प्रकल्प यावर्षी कार्यान्वित होतील असे संकेत दिले आहे. कल्याण डोंबिवली आणि भिवंडी-निजामपूर लगतच्या गावांचा विकास करून तिसर्‍या मुंबईचा प्रस्ताव, वडाळा-महालक्ष्मी मोनोरेल, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो, तसंच एमएमआरडीए भागात 32 पूल,133 किमीचे रस्ते,3 बोगदे अशा भव्य प्रकल्पांचा श्रीगणेशा होण्याची शक्यता आहे.

मुंबईच ‘शांघाय’ असं स्वप्न दाखवण्यात आलं खरं पण हे स्वप्न सहज इतक शक्य नाही हे ही मान्य केलं पण आता मुंबईचं मेकओव्हर करण्याचं नियोजन आखलं जात आहे. विशेष म्हणजे, मुंबईमध्ये आधुनिक पायाभूत सोयीसुविधा देण्यात एमएमआरडीए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावतंय. या नव्या वर्षातदेखील एमएमआरडीए अनेक नवे प्रकल्प कार्यान्वित करणार आहे तर काही नव्या प्रकल्पांची सुरुवात करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे कल्याण डोंबिवली आणि भिवंडी-निजामपूर लगतच्या गावांचा विकास करण्यासाठी एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

येत्या वर्षात होणारे प्रकल्प

- वडाळा-महालक्ष्मी मोनोरेल
- खेरवाडी जंक्शन फ्लायओव्हर

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो
- कल्याण-डोंबिवली लगतच्या 27 गावांचा विकास
- भिवंडी-निजामपूर लगतच्या 61 गावांचा विकास

मेट्रोचं जाळं वाढवणार
- खोपोली बायपास रोड
- भिवंडी रिंग रोड
- कल्याण रिंग रोड
- राज्य महामार्ग 40 आणि 35 जोडणे (शिरगाव-पडघा-टिटवाळा-बदलापूर)

ठाणे-बेलापूर रोडवर फ्लायओव्हर/अंडरपास

- भिवंडी-कल्याण रोडवर फ्लायओव्हर
- जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर फ्लायओव्हर

एमएमआरडीए भागातील प्रकल्प
- पूल-32
- रस्ते- 133 किमी
- बोगदे-3
 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close