सोलापुरात शालेय पोषण आहारातून 112 विद्यार्थ्यांना विषबाधा

January 3, 2015 3:28 PM0 commentsViews:

solapur03 जानेवारी : सोलापूर जिल्ह्यातील करमाळ तालुक्यात शालेय पोषण आहारातून 112 विद्यार्थ्यांना विषबाधा झालीये. सकाळी 11च्या सुमारास करमाळा तालुक्यातील कोर्टी गावात ही घटना घडली. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून 52 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर 58 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे.

शालेय पोषण आहारातून खिचडी देण्यात आली. थोड्याच वेळात मुलांना चक्कर येणं, तसंच उलट्या व्हायला लागल्यानं रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. 112 जणांपैकी 52 विद्यार्थ्याना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलंय. तर 58 विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आलंय. तर 2 जणांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलंय. करमाळा उपजिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ नसल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. त्यामुळे खासगी बालरोग तज्ज्ञांना बोलवण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांवरील उपचार सुरू झाला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close